नांदेड – श्रीक्षेत्र माहूर गडावर बुधवारपासून सुरू झालेल्या नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातील गायवळ तालुका कारंजा येथून आपली बहीण आणि गावकऱ्यासोबत आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा माहूरमधील मातृकुंड तलावात अंघोळ करत असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणातील मयत युवकाचा मृतदेह दुपारी सापडला.
नारळी पौर्णिमेनिमित्त परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक माहूरगडावर बुधवारपासून दाखल झाले आहेत कारंजा तालुक्यातील गायवळ येथील अनिकेत वाल्मीक पूरक वय २८ वर्षे हा युवकही आपली बहीण आणि गावकऱ्यासोबत एका खाजगी वाहनाने माहूरगडावर २७ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. या सर्वांनी आपली परिक्रमा यात्रा पूर्ण केली.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अनिकेत वाल्मीक तूरक हा तरुण परिक्रमा यात्रा पूर्ण करून आंघोळ करण्यासाठी मातृतिर्थ कुंडात पोहण्याचे उद्देशाने उडी मारली. यावेळी तो बुडू लागला. मातृ कुंडाच्या काठावरील पायऱ्यापासून दहा फूट अंतरावर बुडाला. जीवरक्षक दलाच्या जवानांनी उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो खोल गाळात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. दुपारी या युवकाचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात तो ठेवण्यात आला आहे.
सदरील घटना कळताच माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, नायब तहसीलदार कैलास जेठे, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तलाठी चंद्रकांत बाबर, विश्वस्त संजय काण्णव, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मातृतीर्थ कुंडाकडे धाव घेतली.