राजकीय

नांदेड जिल्हा काँग्रेसला आणखी एक धक्का

मारोतराव कवळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

नांदेड – राजकीय, सहकार क्षेत्रातील काम करणारे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एमव्हीके ॲग्रोचे चेअरमन, शंकरराव चव्हाण गूळ कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे यांनी आज १३ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबईमध्ये भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे आमदार राजेश पवार, माजी आमदार अमर राजुरकर, भाजपा नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आदी उपस्थित होते. हा प्रवेश सोहळा होताच कवळे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार सुभाष साबणे आदींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ नांदेड महापालिकेच्या 55 माजी नगरसेवकांसोबतच भोकर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही प्रवेशाची यादी आणखी वाढतच जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!