
नांदेड – येथील सप्तरंग सेवाभावी संस्था विविध उपक्रमाने ओळखली जाते. या संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर मतदाता जागरूकता अभियान व मतदाता स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. सदरील अभियानाअंतर्गत संस्थेचे विविध पदाधिकारी नांदेड शहरातील विविध वस्तीत जाऊन मतदार जागरुकतेचे काम करत आहेत. प्रत्येक घरी ‘मी मतदान करणार’ हे स्टिकर देऊन शपथ घेण्यासाठी प्रेरित करत आहेत, आपण मतदान नक्की करणार. यासोबतच आपण शपथ घेतल्यानंतर मतदार स्वाक्षरी अभियानाअंतर्गत मतदाराच्या स्वाक्षरीने हमी देत त्यांना शपथ देत आहेत की आम्ही नक्की मतदान करणार. नांदेड शहरातील विविध भागातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपण मतदान करण्याचे हमी देत आहेत. यासोबत त्यांनी विविध तृतीय पंथांना देखील या मोहिमेत सहभागी करून घेतले. या नवीन उपक्रमाने युवकांमध्ये व शहरातील अनेक वस्त्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ.सान्वी जेठवाणी यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः मतदान करून इतरांना प्रेरित करण्याच्या हेतूने आपण ही मोहीम राबवत असल्याचे पत्रकारांना सांगितले. अनेक भागात लोक मतदानाविषयी उदासीन आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम अशा मोहिमेने होत आहे असे देखील त्यांनी सांगितले