क्राईम

नांदेडमधील आनंदनगर खून प्रकरणात पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

खुनानंतर आरोपींनी गाठले होते छत्रपती संभाजीनगर, चौकशीनंतर खुनाचे आणखी काही धागेदोरे उलगडणार

नांदेड – नांदेड शहरातील आनंदनगर येथे राजमॉल परिसरात २२ जानेवारी रोजी झालेल्या १७ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणात विमानतळ पोलिसांनी पाच आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे या घटनेतील हे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्गातील किरकोळ वादातून साईनाथ कोळेकर या १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता.

शहरातील आनंदनगर येथे राज मॉलमध्ये बुधवारी सायंकाळी आखाडा बाळापूर येथील मूळचा रहिवासी आणि सध्या विद्युतनगरात राहत असलेल्या साईनाथ प्रकाश कोळेकर या १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला होता. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. त्यांच्या शोधासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकांनी त्यांचा माग काढत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून शोधून काढले आहे. या खूनाच्या घटनेत पाच जणांचा सहभाग होता. या पाचही जणांना पकडण्यात आले आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन आहेत. वर्गातील किरकोळ कारणावरून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता या पाचही आरोपींना छत्रपती संभाजीनगरहून नांदेडकडे आणले जात आहे.गुरुवारी दोघेजण पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर आणखी तिघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात गुरुवारी रात्री उशिरा विमानतळ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलेल्या पाच आरोपीच्या चौकशीनंतर या खून प्रकरणातील आणखी काही धागेद्वारे पुढे येणार आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!