
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यत त्यांची मुदत असेल.मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज ही घोषणा केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हा अध्यक्ष होतो. त्या नियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.. संतोष पांडागळे हे गेली. चार वर्षे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परिषदेचे निरिक्षक, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली आहे.
संतोष पांडागळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचारविनिमय करून आपली कार्यकारिणी तयार करावी, असे संतोष पांडागळे यांना सांगण्यात आले आहे. मावळते अध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि त्यांच्या टीमने आपल्या कार्यकाळात नांदेड जिल्हयात उल्लेखनीय कार्य करून परिषदेची चळवळ अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेने गोवर्धन बियाणी आणि टीमचे कौतूक केले आहे..
संतोष पांडागळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, चिटणीस सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..
संतोष पांडागळे यांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संतोष पाडांगळे प्रयत्न करतील अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.