राजकीय

नांदेडमध्ये अजित दादांच्या दौऱ्याच्या काही तास आधीच राष्ट्रवादीला काँग्रेसला जबरदस्त झटका… 

प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांचा राजीनामा, देगलूर येथील राष्ट्रवादीचे ४ माजी नगराध्यक्ष, १८ माजी नगरसेवक आणि ४ माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही राष्ट्रवादी पक्षाला दिली सोडचिठ्ठी

नांदेड – भारतीय जनता पक्षात चार वर्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास १ वर्षे काम केल्यानंतर पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे २५ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येण्याच्या काही तास आधीच पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत देगलूर येथे राष्ट्रवादीचे ४ माजी नगराध्यक्ष, १८ माजी नगरसेवक आणि ४ माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का पक्षाला बसला आहे. हे सर्व पदाधिकारी, नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला पहिल्यांदाच अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे २५ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पवार यांच्या उमरी आणि देगलूर येथे जाहीर सभा होणार आहेत. या सभांची जय्यत तयारी सुरू असतानाच आणि काही तासातच उपमुख्यमंत्री अजित दादा हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर पोहोचणार असताना पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत देगलूर येथे राष्ट्रवादीचे ४ माजी नगराध्यक्ष, १८ माजी नगरसेवक आणि ४ माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

सुमठाणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात आपण आपल्या काही खाजगी कारणांमुळे आपला राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी सुमठाणकर हे आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ माजी नगरसेवकांसह चार माजी नगराध्यक्ष आणि चार माजी जिल्हा परिषद सदस्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सुमठाणकर यांनी उचललेल्या या पाऊलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे नेते अजित दादा पवार यांची देगलूर येथेही सभा होणार आहे. या सभेच्या काही तास आधीच पक्षातील पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामा सत्र स्थानिक नेतृत्वाचे अपयश मानले जात आहे. त्यामुळे अजित दादा उद्या या प्रकरणात नेमके कोणती भूमिका मांडतात याकडेही लक्ष लागले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पहिल्यांदाच अच्छे दिन…लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस पक्षाला विधानसभा  निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात सपाटून मार खावा लागला आहे. जिल्ह्यात एकही काँग्रेसचा आमदार निवडून आला नाही. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते हे भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसला लागलेली ही गळती रोखण्यासाठी काँग्रेसचा कोणताही सक्षम नेता पुढे आला नाही. माजी सनदी अधिकारी आणि भाजपा तसेच राष्ट्रवादीत काम केल्यानंतर रामदास पाटील सुमठाणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ माजी नगरसेवकांसह चार माजी नगराध्यक्ष आणि चार माजी जिल्हा परिषद सदस्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हे अच्छे दिन म्हणावे लागतील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!