प्रशासकीय

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात शिकाऊ उमेदवारांची नेमणूक होणार 

नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांनाच विविध १०४ पदांसाठी ११ ते २० जून दरम्यान करता येणार अर्ज

नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात सन २०२४-२५ सत्रासाठी व्यवसायनिहाय वाढीव प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणून विविध १०४ पदांची ऑनलाइन पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये ५० मेकॅनिक मोटार व्हेईकल, २८ डिझेल मेकॅनिक, १० शिट मेटल वर्क्स, ८ ॲटो इलेक्ट्रीशियन, ४ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर), २ पेन्टर (जनरल) आणि २ वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक) अशी एकूण १०४ पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग करीता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत राहणार आहेत. त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार नेमणूक करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशन अभासक्रम पूर्ण केलेल्या व ॲटो इंजीनिअरिंग टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे व नंतर MSRTC DIVISION NANDED या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाचे विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे.

सदर छापील अर्ज दिनांक ११ ते २० जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे स्विकारले जातील. सदर अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गाकरीता ५९० रुपये व मागासवर्गीयांसाठी २९५ रुपये आहे.

सदर शिकाऊ उमेदवार नेमणूक ही नांदेड जिल्ह्याकरीता असून फक्त नांदेड जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील ३ वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी कळविले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!