
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून आणि बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झाले. या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर पोलीस अधिकारी तसेच सर्व ठाणे अधिकारी स्थानिक गुन्हा शाखा यांना आदेशित केले होते. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ लाख ८५ हजार रुपयांचे ११८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या इतर जिल्ह्यातून आणि राज्याबाहेरील मोबाईलचा शोध घेऊन ११८ मोबाईल हस्तगत केले आहेत. या हस्तगत केलेल्या मोबाईलची किंमत १८ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते ६० मोबाईलचे मूळ मालकांना वाटप करण्यात आले. उर्वरित हस्तगत झालेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाच्या फेसबुक पेज आणि ट्विटरवर अपलोड करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा ईएमइआय क्रमांक ओळखून सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथून मोबाईल हस्तगत करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कोकाटे. अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, पोलीस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, रेश्मा पठाण, विलास राठोड, गणेश वाघमारे, किरणकुमार वाघमारे, कृष्णा तलवारे, बालाजी सातपुते, मोहम्मद आसिफ, एजाज खान पठाण, काशिनाथ गारखेडे, अनिल बिरादार, दीपक शेवाळे, किशोर जयस्वाल, राजीव बोधगिरे, विलास कदम, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे, दीपक राठोड आदींनी पार पाडली.