शैक्षणिक

इयत्ता दहावीत नांदेड जिल्ह्याचा ८३.६२ टक्के निकाल 

बारावी प्रमाणेच दहावीचा निकालही घसरला, कंधार तालुका सर्वात मागेच, मुलींनीच पुन्हा एकदा मारली बाजी

नांदेड – इयत्ता दहावीमध्ये नांदेड जिल्ह्याचा ८३.६२ टक्के निकाल लागला आहे. बारावी प्रमाणेच गतवर्षीच्या तुलनेत दहावीचा हा निकाल ८.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावी परीक्षेसाठी ४८ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३९ हजार ५८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात राबवलेल्या कॉपीमुक्ती मोहिमेचा दहावी परीक्षेतही प्रभाव जाणवला असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत २२ हजार ७१४ मुलींनी तर २४ हजार ६१९ मुलांनी परीक्षा दिली. यातील २० हजार १६१ मुली उत्तीर्ण झाल्या. १९ हजार ४१९ मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७८.८७ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.७६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात एकूण निकालाच्या बाबतीत बिलोली तालुका अव्वल राहिला आहे. बिलोली तालुक्याचा ९२.२८ टक्के तर सर्वात कमी ६८.७७ टक्के निकाल हा कंधार तालुक्याचा लागला आहे. नांदेड तालुक्याचा निकाल ८९.५६ टक्के, अर्धापूर ८९.८४, भोकर ८३.०९, देगलूर ८२.७२, धर्माबाद ८६.६९, हदगाव ८४.६९, हिमायतनगर ७९.४३, किनवट ८१.००, लोहा ७९.५५, माहूर ७२.६४, मुखेड ८७.३८, मुदखेड ८३.१४, नायगाव ७८.२८ टक्के आणि उमरी तालुक्याचा निकाल ७६.३५ टक्के निकाल लागला आहे.

लातूर विभागात नांदेड सर्वात मागे..! दहावी बोर्ड परीक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्हा सर्वात मागे राहिला आहे.  नांदेडचा ८३.६२ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक ९२.८० टक्के निकाल लातूर जिल्ह्याचा तर धाराशिव जिल्ह्याचा ९१.२९ टक्के निकाल लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!