दळणवळण

उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने विशेष गाड्या

नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाड्या धावणार 

नांदेड – महाकुंभमेळ्याला सोमवार उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे सुरुवात झाली.  या महाकुंभ मेळ्याला प्रयागराज येथे जाण्याकरीता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत
आजपासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला कुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमात आज सोमवारी पहिले स्नान झाले. पहिल्याच दिवशी या संगमावर दीड कोटीहून अधिक भाविकांनी पहिले अमृत स्नान केले आहे. नांदेडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून या कुंभमेळासाठी भाविक प्रयागराज येथे जात आहेत. या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहे. त्यामध्ये गाडी क्रमांक ०७७२१ नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल. ही गाडी पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७७२२ पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. या गाडीला २२ डब्बे असतील.
गाडी क्रमांक ०७७२५ काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक २५ जानेवारी रोजी सायं. ४.४५  वाजता सुटेल.  निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७७२६ पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी ७ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७०९९ नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७१०० पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. या गाडीला २२ डब्बे असतील.
गाडी क्रमांक ०७१०१ औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक १९ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी  रोजी संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि जालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल.  गाडी क्रमांक ०७१०२ पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक २१ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक २३ फेब्रुवारी आणि दिनांक २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला २२ डब्बे असतील.
गाडी क्रमांक ०७१०३ काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७१०४ पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक २६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता पोहोचेल. या गाडीला २२ डब्बे असतील.
गाडी क्रमांक ०७१०५ सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक ७ फेब्रुवारी  रोजी सायं. ५ वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७१०६ पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक ९ फेब्रुवारी  रोजी दुपारी ३.३०  वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक ११ फेब्रुवारी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. या गाडीला २० डब्बे असतील. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!