Police

नांदेडमध्ये पोलीस निरीक्षकांनी होमगार्डला कर्तव्यावर असताना मारहाण केल्याची तक्रार..!

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले चौकशीचे आदेश, अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव करणार चौकशी

नांदेड – कर्तव्यावर असणाऱ्या एका होमगार्डला नांदेडमध्ये पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याची तक्रार पुढे आली आहे. शहरातील वजीराबाद पोलीस ठाणे अंतर्गत हा प्रकार घडला आहे. आता या प्रकरणाची चौकशी आता अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

शहरातील तिरंगा चौकात वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी गृहरक्षक दलाचे जवान कैलाश गंगाराम हिंगोले यांच्याकडे सोपविण्यात आले होते. कर्तव्य बजावण्यात कुचराई केल्याप्रकरणी वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचे छायाचित्रही समाज माध्यमावर पुढे आले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांना दिले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही वजीराबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडून गृहरक्षक दलाच्या जवानांना शिवीगाळ तसेच सामान्य नागरिकांना मारहाण केल्याचे प्रकार झाले असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहे. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या चौकशीत गृहरक्षक दलाच्या जवानाला मारहाण केल्याच्या प्रकरणात आता नेमका काय अहवाल येतो याकडेही लक्ष लागले आहे. जिल्ह्यात आगामी सण, उत्सवाच्या काळात गृहरक्षक दलाचे जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी पार पाडत असतात. अशा काळात पोलीस अधिकाऱ्यांकडून मारहाण होणे हा प्रकार निश्चितच चिंतनीय मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!