सामाजिक

बिलोली येथे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ओळखपत्रांचे वाटप 

जिल्ह्यात आतापर्यंत किनवट, माहूर, मुदखेड तालुक्यातील ओळखपत्रांचे वितरण, उर्वरित तालुक्याचे लवकरच वितरण होणार - जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

नांदेड – जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्ह्यातील संघटनेच्या सदस्यांना ओळखपत्र देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्याच श्रृंखलेअंतर्गत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी बिलोली येथे ओळखपत्र वाटप सोहळा पार पडला.

बिलोली येथे शासकीय शासकीय विश्रामगृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे हे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल कसबे, सरचिटणीस अनुराग पोवळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे व तालुकाध्यक्ष दादाराव इंगळे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी ओळखपत्रांसह अन्य सुविधा देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. संघटना मजबूत झाल्यानंतर समस्या सुटू शकतात. त्यामुळे पत्रकारांनी एकजूट कायम ठेवावी, असे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल कसबे, सरचिटणीस अनुराग पोवळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक दगडे, रत्नाकर जाधव, दादाराव इंगळे यांचेही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केले. या ओळखपत्र वितरण सोहळ्यास बिलोली तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!