नांदेड जिल्हा

भोकर तालुक्यातील पांडुरणा गावात गूढ आवाज, गावकरी झाले भयभयीत..!

तालुका प्रशासनाकडून स्वतःचा बचाव स्वतःच करण्याचे आवाहन, निसर्गापुढे कोणाचेही काहीही चालत नसल्याचाही दिला सल्ला..!

नांदेड – भोकर तालुक्यातील पांडुरणा गावात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम दिशेला भूगर्भातून गूढ आवाज आले आहेत. त्यामुळे गावकरी भयभयीत झाले आहेत. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिली. ही माहिती मिळाल्यानंतर भोकर तालुका प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांना खबरदारी घेताना रात्रीला सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले. त्याचवेळी स्वतःचा बचाव स्वतःच करावा असा सल्लाही दिला. जाहीर सूचनेद्वारे दिलेला हा सल्ला आता गावकऱ्यांसाठी मात्र भीतीदायकच ठरला आहे.

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला भूगर्भातून गूढ आवाज आले. या आवाजाने गावकरी भयभयीत झाले. ही बाब त्यांनी तालुका स्तरावर कळवली. तालुकास्तरावर सदरील घटनेची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी गावात पोहोचले.  भूगर्भातून असे गूढ आवाज येत असताना गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. रात्रीला कोणीही गाफील न राहता आवश्यक ती सर्व सतर्कता बाळगावी आणि स्वतःचा बचाव स्वतःच करावा. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गूढ आवाजाने आधीच भयभयीत झालेले गावकरी प्रशासनाकडून मिळाल्या सूचनानंतर आणखीच गर्भगळीत झाले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती दिली. त्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची अथवा धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी सुरक्षिततेचा भाग म्हणून ज्यांची घरे पत्र्याची आहेत त्यांनी घरावरील पत्र्यावर मोठे दगड न ठेवता पत्रे बोल्टने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला 02462- 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जनतेला केले आहे.

या संदर्भात भोकरचे तहसीलदार विजय गुंडमवार यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकारचे आवाज दोन वर्षांपूर्वीही आले होते. शुक्रवारी सायंकाळी असे आवाज येत असल्याची माहिती मिळताच गावात तलाठी मंडळ अधिकारी हे पोहोचले आहेत. त्यांनी गावकऱ्यांना सतर्कतेचा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.  गावकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, प्रशासन या सर्व बाबीकडे लक्ष ठेवून असल्याचे भोकरचे तहसीलदार विजय गुंडमवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!