नांदेड – शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असलेल्या माहूर तालुक्यातील शेकापूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनंत रामचरण वर्मा यांना अखेर निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याबाबतचे आदेश सोमवारी काढले आहेत. दुसरीकडे वाळूमाफियावर कारवाई का केली असे म्हणत चक्क तहसीलदारांना मारहाण करणाऱ्या अर्धापूर तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत तलाठी प्रदीप उबाळे यांच्या संदर्भातील अहवाल अर्धापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. आता पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
शेकापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रार्थमिक शिक्षक अनंत रामचरण वर्मा हे ५ डिसेंबर रोजी शाळेमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. याबाबतचा व्हिडिओ गावकऱ्यांनी थेट सोशल मीडियावरच प्रसारित केला. त्यानंतरही वर्मा यांनी आपल्या वर्तनात कोणताही सुधार केला नाही. ६ डिसेंबर रोजीही ते शाळेत दारू पिऊन आले असल्याचा अहवाल माहूरचे गटशिक्षणाधिकारी यांनी सादर केला आहे. त्यामुळे आनंद वर्मा यांनी गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ चे नियम तीनचा भंग केला आहे. त्यामुळे वर्मा यांना सेवेतून निलंबित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आदेश दिले आहेत. निलंबन काळात शिक्षक वर्मा यांचे मुख्यालय हे नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक येथे ठेवण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही तसे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमाप्रमाणे वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे ५ डिसेंबर रोजीच रात्री दहाच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटी येथील एका मोकळ्या जागेत तीन हायवा आणि एक टिप्पर अशी चार वाहने प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे आणि इतर मंडळाधिकारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पकडले. मात्र यावेळी तेथे पिंपळगाव म.चे ग्राम महसूल अधिकारी प्रदीप वामनराव पाटील याने तुम्ही वाळू माफियाविरुद्ध ही कारवाई का करत आहात असे म्हणून तहसीलदार शिंदे यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तलाठी प्रदीप पाटील याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात अर्धापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता तलाठी प्रदीप पाटीलविरुद्ध नेमकी कोणती कारवाई होईल याकडेही लक्ष लागले आहे.
एकूणच जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या वर्तनाबाबत चिंताजनक असे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी वरिष्ठांकडून आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्याबाबतीत होत असलेले दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचीही बाब पुढे आली आहे. अर्धापूर येथील वाळूमाफिया विरुद्धच्या कारवाईत एका पोलीस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र त्या कर्मचाऱ्याचा बचाव झाला की काय याबाबतही शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. नांदेड महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या अधिनस्त एका परिचारिकेचा थेट विनयभंग केल्याचा केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात महापालिकेने त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्या परिचारिकेलाही त्या रुग्णालयातून हटविले आहे. ही प्रशासकीय कारवाई झाली असली तरीही परिचारिकेने केलेल्या आरोपाचे काय..? त्या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होईल का नाही..? हा प्रश्नही पुढे आला आहे. महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीकडे हे प्रकरण सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु एकूणच महापालिकेतील निवडणुकीच्या तयारीची रणधुमाळी पाहता त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अभय मिळते की काय अशीही चर्चा सुरू आहे. विनयभंगासारख्या प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अभय मिळत असेल तर तक्रार करायची कोणाकडे हाच मूळ प्रश्न आहे.