
नांदेड – वाळू वाहतूक करणाऱ्या एका भरदाव्यगातील हायवाने एका वृद्धाला उडविले असल्याची घटना कुंडलवाडी- धर्माबाद रस्त्यावर घडली या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. भरधाव वेगातील हायवा वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगाव घाटावरून वाळू घेऊन निघालेला हायवा कुंडलवाडीमार्गे धर्माबादकडे जात असताना कुंडलवाडी येथील साठे नगरातील गंगाधर भोसले यांना एमएच १४ एचजी ७२८१ क्रमांकाच्या हायवाने जबर धडक दिली. यात गंगाधर भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. घटनेनंतर हायवा चालक पळून गेला आहे. संतप्त नागरिकांनी हायवाचे काच फोडले आहेत. कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच नागरिकांना आवरले आणि जखमी भोसले यांना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा हायवा वाहनाच्या गती आणि नियंत्रणाचा प्रश्न. उपस्थित झाला आहे.
नांदेड शहरात २२ हायवा, टिप्पर विना नंबर प्लेट..! नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा/टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकातर्फे ७ ते ८ डिसेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १८४ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी २२ वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नांदेड शहरी भागात हायवा टिप्पर विना नंबर प्लेट धावत असतील तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्नही पुढे आला आहे. याकडे स्थानिक पोलीस किती गांभीर्याने लक्ष देत आहेत, ही बाबही अधोरेखित झाली आहे.
नांदेड शहरात २२ हायवा, टिप्पर विना नंबर प्लेट..!


