सामाजिक

नांदेडमध्ये सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयास तात्काळ शासकीय मदत द्यावी, संरक्षण द्यावे – अशोक गायकवाड 

भारतीय दलीत पँथरच्या वतीने सक्षम ताटे कुटुंबीयांची घेतली भेट

नांदेड – जातीय द्वेष मनात ठेऊन नांदेडच्या सक्षम ताटे या तरुणाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सक्षमच्या कुटुंबास तात्काळ शासकीय मदत देऊन कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी भारतीय दलीत पँथरचे जिल्हाध्यक्ष अशोक नारायण गायकवाड यांनी केली. गायकवाड यांनी सक्षम ताटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज असल्याची ग्वाही गायकवाड यांनी दिली.

नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या जातीय द्वेष मनात ठेऊन करण्यात आली. या खून प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा करून सक्षमला न्याय द्यावा. त्याच्या कुटुंबीयाला तात्काळ शासकीय मदत द्यावी, सक्षम च्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, सक्षमताटे यांच्या कुटुंबीयास महाडा योजनेमध्ये घरकुल देण्यात यावे, सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या सर्व मागण्यांसाठी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने अशोक नारायण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने पाऊले उचलावीत अशी आग्रहाची मागणी केली. यावेळी शाहूराज गायकवाड,  स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके, बळवंत सूर्यवंशी, पृथ्वीराज गच्चे, सिद्धार्थ लोणे, फारुख तडवी, मो.शारेक तडवी, मोहम्मद फैसल, अब्दुल सलीम अब्दुल मुनीर, राहुल गायकवाड, अनिल कुलकर्णी, शेख अमान आदी उपस्थित होते. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास भारतीय दलीत पँथरच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!