महापालिका

नांदेड महापालिका प्रभाग रचनेवरील १३९ आक्षेपांची सुनावणी पूर्ण

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत जाणून घेतले आक्षेप, २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर होणार 

नांदेड – नांदेड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील आक्षेपांची सुनावणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थित २२ सप्टेंबर रोजी नांदेड महापालिकेत पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह महापालिका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १३९ आक्षेप आले होते. या आक्षेपांची एकाच दिवशी सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप घेण्याची मुदत होती. या मुदतीत १३९ अर्ज, आक्षेप, सूचना प्राप्त झाल्या. त्या सर्व आक्षेप, सूचनांची सुनावणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज २५ सप्टेंबर रोजी घेतली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सुनावणीस आक्षेप घेणाऱ्यांना बोलावण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपासून या सुनावलीला प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत आक्षेप सुनावणी पूर्ण झाली. आता निवडणूक आयोगाला २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभाग क्रमांक सात, आठ तसेच १३ ते १५ प्रभाग रचनेवर सर्वाधिक आक्षेप, ‘वंचित’ ने अतिरिक्त आयुक्तांच्या हस्तक्षेपावर ठेवले बोट… महापालिकेत झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वाधिक आक्षेप हे प्रभाग क्रमांक ७ आणि ८ च्या रचनेवर होते. त्यासोबत प्रभाग क्रमांक १३ ते १५ च्या प्रभाग रचनेबाबतही अनेकांनी आपले आक्षेप, सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे नमूद केल्या. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने मात्र नांदेड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या एकूणच कार्यपद्धतीवर बोट ठेवले. स्थानिक असलेल्या अतिरिक्त गिरीश कदम यांनी एका विशिष्ट पक्षाला पोषक ठरेल अशी प्रभाग निर्मिती करण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी कदम यांच्या गेल्या दोन महिन्यातील सर्व हालचालींची चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, त्यांनी घेतलेल्या स्थानिकांच्या भेटी याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. आमच्या आक्षेपांची दखल न घेतल्यास न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद यांनी दिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर अब्दुल गफार, शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव, साबेर चाऊस, ॲड. प्रमोद नरवाडे, रवी भोकरे आदींनी आपल्या आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!