क्राईम

नांदेडमध्ये खुनाची मालिका सुरूच, शिवसेना शिंदे गटाच्या सोनू कल्याणकरची हत्या

भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही केले होते काम, नांदेडमध्ये दोन दिवसात पाच खून

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

नांदेड – एकेकाळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळलेल्या आणि आता शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष असलेल्या सोनू कल्याणकरची नांदेडमध्ये आज सोमवारी श्रीनगरमध्ये भर रस्त्यामध्ये पहाटे हत्या करण्यात आली. ही हत्या इतकी निर्घृण होती की सोनू कल्याणकर जागीच गतप्राण झाला. दोन दिवसात नांदेडमध्ये खुनाच्या ५ घटना घडल्या आहेत. या सर्व घटना गँग वॉरमधून झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून हे गँगवॉर थांबवण्यासाठी खरच प्रयत्न होत आहेत की नाही हा प्रश्न आता पुढे आला आहे.

आज सोमवारी सकाळी ५.३० वाजेदरम्यान श्रीनगर परिसरात सोनू कल्याणकर हे आपल्या कुत्र्याला घेऊन नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते. त्यावेळी पंचशील कापड दुकानाच्या बाजूस कुमार ड्रेसेससमोर अचानक एक अज्ञात चारचाकी वाहन येऊन थांबले. त्या वाहनातून उतरलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी हत्यारे, चाकू आणि तलवारींचा वापर करत कल्याणकरवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर, मानेवर आणि पाठीवर झपाट्याने वार करत अक्षरशः शरीराची चाळणी केली. या हल्ल्यात सोनू कल्याणकर यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी घटना घडताच तात्काळ पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासाच्या सूचना दिल्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. सोनू कल्याणकर हे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांचे भाचे होते. त्यामुळे या घटनेला सामाजिक आणि राजकीय स्तरावरही मोठे गांभीर्य प्राप्त झाले आहे.

सोनू कल्याणकरवर यापूर्वीही झाला होता गोळीबार…सोनू कल्याणकर यांच्यावर अंतर्गत वादातून यापूर्वीही गोळीबाराची घटना झाली होती. यात ते सुदैवाने बचावले होते; मात्र आज सोमवारी झालेल्या घटनेत त्यांना बचावाची संधी मिळाली नाही. कल्याणकरविरुद्धही अनेक गुन्हे दाखल आहेत. शहरात दोन दिवसात घडलेल्या खुनाच्या तीन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व खून गुन्हेगारी टोळी युद्धातूनच झाले आहे. नांदेडमधील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा एकदा आता सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकेकाळी या गुन्हेगारी डोळ्यातील सदस्य ‘नांदेड नको रे बाबा.. असे म्हणत होते; मात्र आज परिस्थिती बदलली आहे. हे गुन्हेगार थेट मुख्य रस्त्यावर आणि थेट रुग्णालयात जाऊन हत्याकांड घडवत आहेत. त्यांना आता कोणाचीच भीती उरली नाही. त्यामुळे नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!