हवामान

नांदेड जिल्ह्यासाठी आज सायंकाळी सात वाजेपर्यंत रेड अलर्ट तर पुढचे तीन दिवस येल्लो अलर्ट 

हवामान खात्याचा इशारा; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत रेड (RED) अलर्ट जारी केलेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४१ ते ६१ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

त्याचवेळी जिल्ह्यासाठी दि. १७, १८ व १९ ऑगस्ट या चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या काळात जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!