क्राईम

तामसा ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटक 

अल्पवयीन मुलीचा ५० वर्षीय नराधम सातत्याने करत होता पाठलाग, विक्षिप्त हातवाऱ्यानेही मुलीला केले होते त्रस्त

नांदेड – अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून विक्षिप्त हातवारे करणाऱ्या एका पन्नास वर्षीय नराधमाविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खेडकर यांनी दिली.

हदगाव तालुक्यातील तामसा शहरात एका खाजगी संस्थेच्या शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारास काही दिवस उलटले असतानाच तामसा शहरातील नराधम कांताराम नारायण शेकदार (वय ५०) हा एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. शाळेत जात असताना तो तिच्या मागावर असे तसेच विविध हातवारे करून तिचा छळ करत असे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने १७ मार्च रोजी तामसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची तात्काळ दाखल घेत तामसा पोलिसांनी ५० वर्षीय नराधम कांताराव नारायण शेकदार याच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक, भोकरचे अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे, अशी माहिती तामसा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खेडकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!