प्रशासकीय

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी होणार मतदान

नांदेड :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्‍यान नांदेड जिल्‍ह्यातील लोहा विधानसभा मतदार संघामध्‍ये ७ मे रोजी ज्‍या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्‍याठिकाणा पासून २०० मीटर परिसरात पक्षकारांना मंडप उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास व मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे प्रदर्शन करण्‍यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामा व्यतिरिक्त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधित करण्‍यात आले आहे.

नांदेड जिल्‍ह्यातील लोहा या विधानसभा मतदार संघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन  ७ मे २०२४ रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!