Police

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपमहानिरीक्षक उमाप यांनी केला चिंचोलकरसह पथकाचा प्रशस्तीपत्र गौरव

नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत ९२ टक्क्यांहून जास्त समन्स बजावणी, अनेक गुन्हेगार केले हद्दपार

नांदेड – जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३६ पोलीस स्टेशनपैकी उत्कृष्ट कामगिरीबाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकास उत्कृष्ट कामगिरीबाबत दोन प्रशस्तीपत्र देऊन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरीमध्ये अनेक गुन्हेगारांना प्रतिबंध करून त्यांना एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी जेलमध्ये पाठवले. अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले, इतर गुन्हेगार व दारू विक्रेते यांच्यावर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई केली. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक कुसमे, पोलीस अंमलदार तेजबंद यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत ९२ टक्क्यांहून जास्त समन्स बजावणी केली. जास्तीत जास्त साक्षीदार यांना कोर्टात हजर केले. त्याबद्दल म्हणून पोलीस निरीक्षक चिंचोलकर, पोहेकॉ मुंडे, पोहेकॉ जगताप, पोहेकॉ जाधव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वर्षात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण पोलिसांच्या विविध हेड खालील उत्कृष्ट कामगिरी संबंधाने चार वेळा प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला आहे. पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या कार्यकाळामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांवर वचक बसली असून गुन्हेगारी कमी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!