नांदेड – नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणित विजय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या भाजपच्या संकल्पाच्या बाजूने दिलेला कौल आहे. भाजपच्या विकास कामांच्या धडाक्याला हा मतदारांनी दिलेला अनुकूल प्रतिसाद आहे. नांदेड जिल्ह्यातही सहयोगीसह भारतीय जनता पक्षाच्या शंभरहून अधिक जागा निवडून आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला आहे
या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच निर्विवाद क्रमांक एकचा राजकीय पक्ष ठरला असून, भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे अधिकृत तीन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सहयोगी नगराध्यक्षांच्या रुपात यामध्ये अधिक भर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपचे अधिकृत ७४ नगरसेवक निवडून आले असून, सहयोगी सदस्यांसह आमचे एकूण संख्याबळ १०० च्या घरात पोहचते.
काही नगरपरिषदांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये त्या-त्या आमदारांवर उमेदवार निश्चितीपासून रणनितीपर्यंत संपूर्ण जबाबदारी होती. परंतु, कदाचित काही ठिकाणी उणिवा व समन्वयाचा अभाव राहिल्याने भाजपचे संख्याबळ अधिक वाढू शकले नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या उणिवा दूर करून आम्ही त्याची भरपाई करू, याचा मला विश्वास आहे.
दरम्यान, बिलोली येथील मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांनी आगामी काळात आमची वाटचाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होईल असे स्पष्ट केले आहे. आगामी काळात बिलोलीसह परिसराचा विकास करण्यासाठी भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली आपण काम करणार असल्याचे समाज माध्यमावरील एका संदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बिलोली येथील मराठवाडा जनहित पार्टी ही भाजपाचाच भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्यांक मतांना आकर्षित करण्यासाठी मराठवाडा जनहित पार्टी उभी करण्यात आली होती, त्यात घवघवीत यश आले. आहे. त्याच धर्तीवर आता नांदेडमध्येही स्थानिक विकास आघाडी निश्चितपणे उभी करून भारतीय जनता पक्षाची वाटचाल महापालिका निवडणुकीत होणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.