क्राईम

नांदेडमध्ये अर्धापूर पोलिसांनी रोखला बालविवाह..!

किनवट उपविभागीय अधिकारी, अर्धापूर गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाली होती माहिती, बालविवाह प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

नांदेड – अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतामध्ये रविवारी एक बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच अर्धापूर पोलिसांनी तेथे धाव घेत हा बालविवाह रोखला. या बालविवाहप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहताच लग्नासाठी आलेल्या मंडळींनी धूम ठोकली.

अर्धापूर पोलिसांना या बालविवाह प्रकरणात अर्धापूरचे गटविकास अधिकारी तसेच किनवट उपविभागीय अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली. दाभड शिवारातील आशा फार्म हाऊसच्या पाठीमागे एका शेतामध्ये हा बालविवाह होणार होता. किनवट तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा (१६ वर्षीय) विवाह पाथरी येथील तरुणाची लावण्याची तयारी पूर्ण झाली होती. अर्धापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर कदम हे थेट घटनास्थळी पोहोचले. यावेळी महिला व बालविकास कार्यालयातील ऐश्वर्या शेवाळे, दिपाली इंगोले, वंदना लोखंडे, प्रकाश दादजवार हेही उपस्थित होते. पोलिसांचे वाहन पाहताच या लग्नासाठी आलेली मंडळी पळून गेले. याप्रकरणी मुलीचे आई-वडील, मामा, मामी तसेच मुलाचे आई-वडील मामा तसेच मावसा या आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दाभड येथील ग्रामसेवक दामोदर मारोतराव गमे यांच्या तक्रारीवरून मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये धरमसिंग गोवर्धन भाटी, सविता धरमसिंग भाटी, चरण सुभाष राठोड, वैशाली चरण राठोड, सुभाष राठोड, सयाबाई राठोड, बालाजी तसेच लग्नासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी नंदलाल बंडू जाधव यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ चाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!