नांदेड – जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात मंगळवारपासून पावसाने विश्रांती दिल्याने पूर परिस्थिती हळूहळू ओसरत असल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या ६ दरवाज्यातून ६२ हजार २९४ क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
विष्णुपुरीसह दिग्रस, अंतेश्वर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. गोदावरीची ३५४ मीटर धोक्याची पातळी असताना ही पातळी ओलांडून गोदावरी नदी ३५५ मीटर पातळीवर पोहोचली होती. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता. हा विसर्ग जवळपास २ लाख ३४ हजार क्युसेस वेगाने सुरू होता. परिणामी शहरातील गोदावरी काठचे अनेक सखल भाग जलमय झाले होते. त्यामुळे नांदेड महापालिकेने स्थापन केलेल्या १५ निवारा केंद्रावर पूर प्रभावित नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. शहरातील विविध भागातील जवळपास दीड हजार नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याची वेळ आली होती. मात्र मंगळवारी रात्रीपासून पूर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजता विष्णुपुरी प्रकल्पाचे ६ दरवाजे सुरू होते. गोदावरी नदीची पाणी पातळीही ३५५ मीटरवरून ३५०.८० मीटरपर्यंत ओसरली आहे. त्यामुळे पूर परिस्थिती ओसरण्यास मदत होत आहे. गोदावरी नदीवरील संत दासगणू पुलावर अजूनही पाणी आहे. मात्र २ ते ३ तासात पाणी ओसरेल अशी परिस्थिती असल्याचे गोदावरी जीवरक्षक दलाचे प्रमुख सय्यद नूर पहेलवान यांनी सांगितले.
नांदेड शहरात स्वच्छता आणि आरोग्याचे आता मोठे आव्हान..! शहरातील पूर हळूहळू ओसरत असून आता नांदेड महापालिकेपुढे स्वच्छता आणि आरोग्याचे मोठे आव्हान आहे. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, उपायुक्त अजितपालसिंघ संधू हे अजूनही शहरातील पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेच्या कामाकाही आता लवकरच प्रारंभ केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचवेळी आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख संधू म्हणाले.